पाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत!

Indian Premier League ( IPL 2020) 13वे पर्व 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंबरोबरच सर्वात वयस्कर खेळाडूंवरही नजर असणार आहे. कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत.

इम्रान ताहीर ( Imran Tahir) - 41 वर्ष, IPL 2020 पगार - 1 कोटी, संघ - चेन्नई सुपर किंग्स ( CSK), IPL मधील एकूण पगार - 6 कोटी 50 लाख; दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज CSKचा प्रमुख अस्त्र आहे. IPL 2019मध्ये त्यानं 17 सामन्यांत 26 विकेट्स घेत पर्पल कॅप ( Purlple Cap) पटकावली होती.

ख्रिस गेल ( Chris Gayle) - 40 वर्ष, IPL 2020 पगार - 2 कोटी, संघ - किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP), IPL मधील एकूण पगार - 56 कोटी 56 लाख 57,000; ट्वेंटी-20 प्रकारातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून गेलकडे पाहिले जाते. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 4484 धावा आहेत, IPL मधील सर्वोत्तम वैयक्तिक ( 175*) खेळीचा विक्रम, सर्वाधिक 326 षटकार आणि 369 चौकाराचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

शेन वॉटसन ( Shane Watson) - 39 वर्ष, IPL 2020 पगार - 4 कोटी, संघ - चेन्नई सुपर किंग्स ( CSK), IPL मधील एकूण पगार - 77 कोटी 13 लाख 48,250; 2018च्या लिलावात CSKनं शेन वॉटसनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानं CSKसाठी मागील दोन वर्षांत 32 सामन्यांत 953 धावा केल्या आहेत. IPLमध्ये त्याच्या नावावर एकूण 3575 धावा आणि 92 विकेट्स आहेत.

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) - 39 वर्ष, IPL 2020 पगार - 15 कोटी, संघ - चेन्नई सुपर किंग्स ( CSK), IPL मधील एकूण पगार - 137.8 कोटी; भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची ख्याती आहे. त्यानं CSKला तीन जेतेपदं जिंकून दिली आहेत. कर्णधार म्हणून त्यानं CSKकडून 174 सामने खेळले आहेत आणि त्याच्या विजयाची टक्केवारी ही 59.8 इतकी आहे. IPLमध्ये 100 सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार आहे.

डेल स्टेन ( Dale Steyn) - 37 वर्ष, IPL 2020 पगार - 2 कोटी, संघ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB), IPL मधील एकूण पगार - 47 कोटी 15 लाख 08,250; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजानं 96 सामन्यांत 92 विकेट्स घेतल्या आहेत.