IPL 2020 : CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

IPL 2020ला सुरुवात होण्यापूर्वी CSK ला दोन मोठे धक्के बसले आहेत. सुरेश रैना ( Suresh Raina) आणि हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यांनी वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली CSK हे सर्व संकट बाजूला टाकून आणखी एक जेतेपद पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

पहिल्या सामन्यापूर्वी CSKनं गुरुवारी संघातील खेळाडूंचा सत्कार केला. पण, या सत्कार सोहळ्यात रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja) दिलेली 'तलवार' ट्रॉफी सर्वांचे लक्ष वेधून गेली.

महेंद्रसिंग धोनीला ( MahendraSingh Dhoni) CSK कडून सर्वाधिक धावा केल्या म्हणून गौरविण्यात आले.

शेन वॉटसन ( Shane Watson) याने पायाला जखम होऊनही CSKसाठी मैदानावर तुफान फटकेबाजी केली होती. त्यासाठी त्याला विशेष पुरस्कार देण्यात आले.

2019च्या आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या इम्रान ताहीरलाही गौरविण्यात आले. तोही क्वारंटाईन आहे.

संजय नटराजन यांनी गेली दहा वर्ष CSKचे लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

माइक हसीनं CSK सोबत दहा वर्ष पूर्ण केली, म्हणून त्याचाही सत्कार करण्यात आला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा पहिल्या गोलंदाजाचा मान पटकावणाऱ्या ड्वेन ब्राव्होलाही पुरस्कार देण्यात आला.

क्वारंटाईनमध्ये असलेल्या ब्राव्होनं व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सोहळ्याला उपस्थिती लावली.

IPL मध्ये 100 + विकेट्क आणि 1900+ धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज म्हणून CSKनं रवींद्र जडेजाला गौरविले. शिवाय लेफ्ट हँडर फिरकीपटू म्हणून IPLमध्ये सर्वाधिक 108 धावांचा विक्रमही जडेजाच्या नावावर आहे.