CSK ने सर जडेजाला दिलं खास मौल्यवान गिफ्ट, सोशल मीडियावर शेअर होताहेत फोटो

मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी सीएसकेच्या संघाने आपला स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला खास पद्धतीने सन्मानित केले आहे.

आयपीएलमध्ये शनिवारी होणाऱ्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसानमे येणार आहेत. दरम्यान, या लढतीपूर्वी सीएसकेच्या संघाने आपला स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला खास पद्धतीने सन्मानित केले आहे.

चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने रवींद्र जडेजाला तलवार भेट केली आहे. फलंदाजी करत असताना चौकार-षटकार मारल्यावर खास अंदाजामध्ये तलवारबाजी करण्यासाठी रवींद्र जडेजा प्रसिद्ध आहे.

चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने एका खास बक्षीस वितरण समारंभामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सोन्याची टोपी दिली. तर यावेळी रवींद्र जडेजाला सोन्याची तलवार देण्यात आली.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते जडेजाला ही भेट देण्यात आली. त्यानंतर ही भेट स्वीकारतानाचे फोटो रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आयपीएलच्या इतिहासामध्ये रवींद्र जडेजा १०० हून अधिक बळी टिपणारा आणि १९०० हून अधिक धावा करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत १०८ बळी टिपले आहेत. तसेच आयपीएलमध्ये १०८ बळी घेणारा जडेजा हा एकमेव डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.