IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझी यांच्यात शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गव्हर्निंग काऊंसिलनं बोलावलेल्या या बैठकीत आयपीएलच्या १३व्या मोसमासंदर्भात चर्चा झाली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे १३वे मोसम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे आणि त्यानंतर कोणती पावलं उचलायची यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांनी ६ ते ७ पर्यायांवरही चर्चा केली.

पर्याय १ - आयपीएल रद्द करा

पर्याय २ - आयपीएलचे वेळापत्रक बदला

पर्याय ३ - ८ संघांची प्रत्येकी चार अशा दोन गटांत विभागणी करून गटातील अव्वल दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगवा अन् नंतर अंतिम फेरीचा सामना खेळवा

पर्याय ४ - डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवा. आयपीएलच्या आधीच्या वेळापत्रकानुसार केवळ ६ डबल हेडर सामने होणार होते.

पर्याय ५ - काही ठरावीक शहरांतच आयपीएलचे सामने खेळवा

पर्याय ६ - प्रती दिवस तीन सामने खेळवा

पर्याय ७ - स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी न देता सामने खेळवा