युजवेंद्र चहल नाचणार कोरिओग्राफरच्या तालावर; जाणून घ्या कोण आहे धनश्री वर्मा, पाहा PHOTO

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले.

युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.

धनश्री ही प्रसिद्ध यूट्यूब स्टार आहे. नृत्य, एक्स्प्रेशन आणि कोरिओग्राफीमुळे ती सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध आहे.

ती स्वतःच्या नावानं यू ट्यूब चॅनल चालवते आणि तिच्या प्रत्येक व्हिडीओला लाखाहून अधिक View मिळतात.

ती मुळची मुंबईची आहे. तिची उंची 5.3 फुट आहे.

यूट्यूबवर तिचे 850 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत,