लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा!

कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक क्रिकेटपटूंनी पुढाकार घेऊन केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली. विराट कोहली, गौतम गंभीर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आदी सर्वांनी त्यांच्या परीनं मदत केली.

पण, केवळ क्रिकेटपटूच नव्हे, तर त्यांच्या पत्नीही समाजकार्यात आघाडीवर असतात. भारताचा चपऴ श्रेत्ररक्षक सुरेश रैना याची पत्नी प्रियांका रैना गरीब कुटुंबांना मदत करण्याचं काम करते.

सुरेश आणि प्रियांका यांनी त्यांची कन्या ग्रेसिया हिच्या नावानं एक फाऊंडेशन स्थापन केलं आहे. यात सुरेश रैनापेक्षा त्याच्या पत्नीचं अधिक योगदान आहे.

क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे सुरेश रैना या फाऊंडेशनच्या कामासाठी फार कमी वेळ देतो.

प्रियंका बँकिंग सेक्टरमध्ये कामाला होती आणि लाखोंच्या पॅकेज ती घ्यायची. पण, तिनं स्वतःला समाजसेवेत झोकून दिले आहे.

प्रियंका लग्नापूर्वी नेदरलँड्समध्ये बँकिंग सेक्टरमध्ये काम करायची. तिनं BTech केलं आहे आणि त्यानंतर आयटी प्रोफेशनल म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

2015मध्ये तिचं आणि प्रियंका यांनी लग्न केलं. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर प्रियंका भारतात आली आणि त्यानंतर या जोडप्यानं मुलीच्या नावानं फाऊंडेशन सुरु केलं.

या फाऊंडेशनचं प्रमुख उद्देश हे गरीब मुलांना मदत करण्याचं आहे.