India vs West Indies : कोहलीला टेंशन चौथ्या क्रमाकांचं, पण हे असू शकतात पर्याय

रिषभ पंत : विश्वचषकात भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी रिषभ पंतला देण्यात आली होती. पण त्याला या क्रमांकाला न्याय देता आला नव्हता.

लोकेश राहुल : विश्वचषकात राहुलकडे चौथ्या क्रमांकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे त्याला सलामीला जावे लागले होते.

श्रेयस अय्यर : भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. या मालिकेत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात येऊ शकते.

मनीष पांडे : मनीष हा चौथ्या क्रमांकासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मनीषकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे या क्रमांकासाठी त्याला संधी मिळते का, हे पाहावे लागेल.