India tour of Australia : टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवड समितीची डोकेदुखी वाढली

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जम्बो संघ पाठवण्याची तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे.

पण, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये टीम इंडियातील प्रमुख शिलेदारांना झालेली दुखापत ही निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करताना BCCIचा कस लागणार आहे.

इशांत शर्मा - दिल्ली कॅपिटल्सच्या जलदगती गोलंदाजाने आयपीएलमधून माघार घेतली.

भुवनेश्वर कुमार- सनरायझर्स हैदराबादचा उप कर्णधार आणि प्रमुख गोलंदाजानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे.

रोहित शर्मा - हॅमस्ट्रींगमुळे रोहित शर्मा मागील दोन सामने खेळलेला नाही आणि त्याची दुखापत बरं होण्याचं नाव घेत नाही.

हार्दिक पांड्या - मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूनं दमदार फटकेबाजी केली असली तरी त्यानं एकाही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे त्याचा कसोटी संघासाठी विचार केला जाऊ शकत नाही

मयांक अग्रवाल - किंग्स इलेव्हन पंजाबच्या सलामीवीरालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

नवदीप सैनी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या गोलंदाजाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

Read in English