वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने रचले नवे विक्रम, कोणते ते पाहा...

भारताने वेस्ट इंडिजवर 2-0 असा दमदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने बरेच विक्रम नोंदवले आहेत.

विराट कोहलीचा हा 28वा विजय ठरला. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम आता कोहलीच्या नावावर आहे.

या सामन्यात बुमराने हॅट्रिक नोंदवत इतिहास रचला. वेस्ट इंडिजमध्ये हॅट्रिक मिळवणारा बुमरा हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.

भारताकडून हनुमा विहारीने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

वेस्ट इंडिजवर 2-0 असा मालिका विजय मिळवत भारताने विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत 120 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

या सामन्यात भारताच्या चारही गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त काळ टिकू दिले नाही.

या सामन्यात जीवदानाचा फायदा उचलत वेस्ट इंडिजच्या ब्रुक्सने अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्यांच्या संघाकडून हे एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले.