फायनलमध्ये खेळलास तर बोटं कापून टाकू, आर. अश्विनला मिळाली होती धमकी

भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला तेव्हा आर. अश्विन भारतीय संघात होता. पण त्यावेळी हरभजन सिंगला जास्त संधी देण्यात आली होती.

भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी खेळली होती. ही स्पर्धा भारताने जिंकली होती.

या स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला होता. त्यावेळी अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी धोनीने अश्विनवर सोपवली होती.

अश्विनने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली होती. अश्विनने अखेरच्या षटकातही टिच्चून मारा केला आणि भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता.

अश्विनला एकदा किडनॅप करण्यात आले होते. त्यावेळी अश्विनला सांगण्यात आले होते की, जर तु फायनलचा सामना खेळलास तर तुझी बोटे कापून टाकू.

अश्विनचा संघ अंतिम फेरीत आला. अश्विन तेव्हा चांगलाच फॉर्मात होता. अंतिम सामन्यापूर्वी चार जण अश्विनकडे आली. त्यांनी त्याला बोलावले आणि बाईकवरून लांब घेऊन गेले.

इच्छित स्थळी पोहोचल्यावर त्यांनी अश्विनला किडनॅप झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर फायनल सामना संपल्यावर त्यांनी अश्विनला घरी सोडून दिले होते. ही गोष्ट जवळपास १८ वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा अश्विन टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता.