भारताने कसा मिळवला सुपर विजय; पाहा फक्त एका क्लिकवर

सलामीवीर रोहित शर्माने हा सामना भारताला जिंकवून दिला. त्यामुळेच रोहितला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पण या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार नेमका रंगला तरी कसा, पाहा...

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला.

केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले.

रोहित 40 चेंडूंत 65 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितने दहा हजा धावांचा टप्पा पूर्ण केला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एक विक्रम नोंदवला. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा तो भारताचा कर्णधार ठरला आहे.

भारतानं 20 षटकांत 5 बाद 179 धावा केल्या. या आव्हानाचा बचाव करताना युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत दोन बळी मिळवले.

भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजानेही यावेळी टिच्चून मारा केला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने संघाची बाजू लावून धरली आणि संघाला विजयासमीप पोहोचवले.

संघाला विजयासाठी फक्त तीन धावा हव्या असताना केन आऊट झाला. केननंतर एका चेंडूवर एक धाव हवी असताना रॉस टेलरही बाद झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्येही केनने भन्नाट फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला विजयासाठी १८ धावांची गरज होती.

सुपर ओव्हरमध्ये रोहित भारतासाठी फलंदाजीला उतरला, पण पहिल्या दोन चेंडूंवर त्याला फक्त तीन धावाच काढत्या आल्या.

अखेरच्या दोन चेंडूवर रोहितने सलद दोन षटकार लगावले आणि भारताला सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकवून दिला.