बीसीसीआयने करारामधून वगळल्यानंतरही धोनी भारताकडून खेळू शकतो, कसं ते वाचा...

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सैन्यदलाच्या सेवेतही रुजू झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला सेंट्रल करारातून वगळण्यात आले.

गतवर्षी धोनीचा करारात ए ग्रेडमध्ये समावेश होता.

यावर्षी धोनीला करारामध्ये सी ग्रेडमध्येही स्थान दिलेले नाही.

या करारामधून वगळल्यानंतरही धोनी अजून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकतो.

धोनीने अजूनही निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याचे नाव करारात नसले तरी तो खेळू शकतो.

धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल.

धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही. बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

या विश्वचषकापूर्वीही धोनी आपल्याला बीसीसीआयच्या कराराच्या यादीत दिसू शकतो. धोनी जर ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी खेळला तर बीसीसीआयला धोनीला आपल्या करारामध्ये सामील करून घ्यावे लागेल. यासाठी बीसीसीआयने एक तरतूद केलेली आहे. धोनी जर विश्वचषकापूर्वी खेळला तर त्याला 'प्रो-रेटा' या तत्वावर बीसीसीआयच्या करारामध्ये सामील करण्यात येऊ शकते.

धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेतल्यास त्याला त्याचा हिस्सा मिळेल. पण, या करारानुसार धोनी पर्वाचा शेवट जवळ आला आहे, असं काही चाहते म्हणत आहेत.