हार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा!

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं गुरुवारी गोड बातमी दिली. हार्दिक अन् त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. हार्दिकला पुत्ररत्न झाल्याचे कळताच क्रीडा विश्वातील अनेकांनी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती.

शिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं.

बुधवारी हार्दिक-नताशानं डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत केक कापून पुत्ररत्नाचा आनंद साजरा केला. त्यानंतर ही दोघं बाळाला घेऊन घरी परतली.

घरात आलेल्या छोट्या पाहूण्यासाठी कृणाला पांड्या आणि त्याची पत्नीनं पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी आणलेल्या केकवरून हार्दिकच्या मुलाच्या नावाचा खुलासा झाला.

हार्दिक किंवा त्याच्या कुटुंबीयांतील कुणीही अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु केक कंपनीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवरून ज्युनियर पांड्याचं नाव काय असेल, हे सर्वांना कळले आहे.

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नच बलिये या कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता.

केकव नॅट्स ( नताशा) आणि अगस्त्या ( Agastya) असे लिहिले आहे. त्यावरून ज्युनियर पांड्याचं नाव अगस्त्या असे असेल असा अंदाज बांधला जात आहे.

Read in English