भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला आहे. चहलने या वर्षाच्या सुरुवातीला कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर चहलचे नाव आरजे महावश हिच्याशी जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहे. मात्र, दोघांनीही प्रेमसंबंधावर भाष्य केले नाही. परंतु, अनकेदा हे दोघे एकत्र दिसले आहेत.