चार चेंडू, चार विकेट्स आणि सहा गोलंदाज; पाहा विक्रमांची खास यादी

आंद्रे रसेल : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेलने भारताविरुद्धच्या सराव सामन्यात चार चेंडूंत चार बळी मिळवण्याचा पराक्रम पहिल्यांदा केला होता. रसेलने युवराज सिंग, केदार जाधव, नमन ओझा आणि युसूफ पठाण यांना सलग चार चेंडूंमध्ये बाद केले होते.

अल अमिन होसेन : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज अल अमिन होसेनने एका स्थानिक सामन्यांमध्ये चार चेंडूंत चार बळी मिळवले होते. हा पराक्रम करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता.

अल्फान्सो थॉमस : दक्षिण आफ्रिकेचा वागवान गोलंदाज थॉमसने कौंटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. हा पराक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता.

केव्हान जेम्स : इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्सने चार चेंडूंमध्ये अनुक्रमे विक्रम राठोड, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि संजय मांजरेकर यांना बाद करत हा पराक्रम केला होता.

गॅरी बुचर : गॅरीने कौंटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. गॅरी हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्कचा लहान भाऊ होता.

लसिथ मलिंगा : मलिंगाने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात हा पराक्रम केला होता. मलिंगाने २००७ साली एकदिवसीय क्रिकेटमध्येही असाच पराक्रम केला होता.