'या' पाच क्रिकेटपटूंवर आहेत विनयभंगाचे आरोप; भारताच्या स्टार क्रिकेटरचेही या प्रकरणांमध्ये नाव

आतापर्यंत क्रिकेट विश्वातील पाच क्रिकेटपटूंवर विनयभंग, मारहाण आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. हे पाच खेळाडू आहेत तरी कोण, ते जाणून घ्या...

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगावर विनयभंगाचा आरोप बॉलीवूडमधील गायिका चिन्मयी श्रीपदाने लावला होता. आयपीएलच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले होते.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर अभिनेत्री नाझनीन अख्तरने विनयभंग, बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ल्यूक पॉमर्शबॅकवर त्याच्या प्रेयसीनेच २०१२ साली विनयभंगाचा आरोप केला होता.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीने घरातील मोलकरणीचा विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले होते.

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रावर त्याच्या मैत्रिणीनेच विनयभंग आणि मारहाणीचा आरोप केला होता. याप्रकरणी मिश्राला बंगळुरु पोलीसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते.