IPL 2021: महेंद्रसिंग धोनीला एका २८ वर्षीय खेळाडूनं मोठ्या संकटातून वाचवलं, नाहीतर...

IPL 2021: आयपीएलमध्ये शुक्रवारी चन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) असा सामना रंगला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका मोठ्या संकटातून वाचला आहे. जाणून घेऊयात...

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ जेव्हा शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा महेंद्रसिंग धोनीवर एक मोठं संकट ओढवण्याची भिती होती.

धोनीनं आणि चेन्नईच्या संघानं त्यावर उपाय शोधला नसता तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असते. पण चेन्नईच्या संघातील एक २८ वर्षीय खेळाडू धोनीसाठी संकटमोचक ठरला.

धोनीला संकटातून वाचवणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे दिपक चहर. पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिपक चहर चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार तर ठरलाच पण त्यानं आखणी एका संकटातून धोनीला वाचवलं.

त्याचं झालं असं की चेन्नईची पहिली लढत रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झाली होती. या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण धोनीवर सामन्यात स्लो-ओव्हर रेटचा ठपका ठेवण्यात आला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

आयपीएलच्या नव्या नियमांनुसार सामन्यातील एक डाव ९० मिनिटांत पूर्ण होणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास संघाच्या कर्णधाराला जबाबदार धरण्यात येतं. एकवेळ चूक झाल्यास दंड आणि दुसऱ्यांदा चूक झाल्यास २४ लाखांचा दंड आणि तिसऱ्यांदा थेट कर्णधारावर एका सामन्याची बंदी येऊ शकते असा हा नियम आहे.

त्यामुळे पंजाब विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला विजय तर प्राप्त करायचा होताच. पण संघातील खेळाडूंना धोनीवर ओढावणाऱ्या मोठ्या संकटातूनही वाचवायचं होतं. दिपक चाहरनं कमालीची गोलंदाजी करत पंजाबच्या चार फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं.

दिपक चहरनं अवघ्या १३ धावा देत चार विकेट घेतल्या. त्यात षटकं पटापट संपतील याचीही त्यानं काळजी घेतली. धोनीनंही दिपक चहरच्या चारही ओव्हर पावर प्लेच्या दरम्यानच संपवून टाकल्या.

दिपक चहरच्या अफलातून गोलंदाजीमुळे पंजाबच्या संघाला अवघ्या १०६ धावाच करता आल्या आणि डाव देखील निर्धारित वेळेत संपला.

चेन्नई सुपरकिंग्जच्या संघानं पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना ६ विकेट्स आणि २६ चेंडू राखून जिंकला. चेन्नईनं सामना तर जिंकलाच पण धोनीवर ओढावणारं दंडाचं संकट देखील टळलं.

पंजाब किंग्ज विरुद्धच्या दमदार विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्जच्या खात्यात चांगला रनरेट देखील जमा झाला आहे आणि संघ गुणतालिकेत आता थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीचा संघ ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.