आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:53 PM2021-07-26T18:53:51+5:302021-07-26T18:55:42+5:30

इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. इथे बीसीसीआयनं वेळापत्रक जाहीर केलं अन् मुंबईत CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरलेला पाहायला मिळाला.

मुंबईत मनोरंजनाच्या उद्देशानं दर रविवारी फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाते त्यात धोनीसह दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरनेही सहभाग घेतला होता. यावेळी बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर, अर्जून कपूर आणि टायगर श्रॉफ हेही या सामन्यात सहभागी झाले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!