"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

Sunil Gavaskar Angry on MS Dhoni IPL 2025 Rules: महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघाची अतिशय खराब कामगिरी सुरु आहे

स्पर्धा आता रोमांचक वळणावर आहे. प्लेऑफचे चित्रही हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा स्पर्धेतून सर्वप्रथम बाहेर झाला.

ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर महेंद्रसिंग धोनीला संघाचा कर्णधार करण्यात आले. पण तरीही संघाच्या कामगिरीमध्ये फारसा फरक पडला नाही. १० सामन्यांनंतरही CSK शेवटच्या स्थानावरच आहे.

याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीचे नाव घेत संताप व्यक्त केला. आयपीएलमधील काही नियम अचानक बदलण्यात आले. या नियमावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुनील गावस्कर म्हणाले, "धोनीसाठी अनकॅप्ड खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यात आली आणि त्यांना कमीत कमी ४ कोटी मिळतील असे ठरवले गेले. हा नियम बदलणे क्रिकेटसाठी हानिकारक आहे."

"आयपीएल २०२५च्या हंगामापूर्वी, अनकॅप्ड खेळाडू नियम परत आणण्यात आला होता, ज्या अंतर्गत पाच वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंना 'अनकॅप्ड' ठरवण्यात आले."

"जास्त पैसे दिल्याने खेळाडूंची क्रिकेटची आवड आणि टीम इंडियासाठी खेळण्याची भूक कमी होऊ शकते. याचा फ्रँचायझीवर परिणाम होणार नाही, पण भारतीय क्रिकेटचे नुकसान होऊ शकते."

"IPLच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात कधीच एखाद्या अनकॅप्ड खेळाडूला सरसकट एवढी मोठी रक्कम दिली जात नव्हती. खेळाडूंच्या भविष्याच्या दृष्टीने ही घातक बाब आहे," असेही गावसकर म्हणाले.