उरण तालुक्यातील ६१ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 21:59 IST2022-12-17T21:58:42+5:302022-12-17T21:59:12+5:30
रविवारी होणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिक ठिकाणी रवाना करण्यात आले.

उरण तालुक्यातील ६१ मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य रवाना
मधुकर ठाकूर
उरण : रविवारी होणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिक ठिकाणी रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरणनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी ६१ मतदान केंद्र आहेत.या ६१ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी ३६६ कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (१७) उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, रानसई,पुनाडे,सारडे,नवीन शेवा, धुतुम,करळ, कळंबुसरे , बोकडविरा , वशेणी,पागोटे,पिरकोन, जसखार, चिर्ले,भेंडखळ,नवघर आदी १७ ग्रामपंचायत मध्ये वोटिंग मशिन, मतदान साहित्य पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.