अंथरुणाला खिळून असलेले मतदानापासून राहणार वंचितच, गृहमतदानाची सोयच नाही : राज्य निवडणूक आयुक्त
By नामदेव मोरे | Updated: December 24, 2025 09:45 IST2025-12-24T09:45:23+5:302025-12-24T09:45:37+5:30
- नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या आजारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ...

अंथरुणाला खिळून असलेले मतदानापासून राहणार वंचितच, गृहमतदानाची सोयच नाही : राज्य निवडणूक आयुक्त
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या आजारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय होती. परंतु महापालिका निवडणुकीसाठी अशी सुविधाच देण्यात आलेली नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहाण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांना नेमके मतदान करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. राज्यातील सर्व मतदारसंघांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले हाेते.
मुंबईत १० विधानसभा मतदारसंघांत १९५६ व ठाण्यात ८०० पेक्षा जास्त ज्येष्ठांनी गृहमतदानात सहभाग घेतला होता. ज्येष्ठांच्या उत्साहामुळे मतदानाचा टक्का वाढण्यासही मदत झाली होती. १०० पेक्षा जास्त वय असलेल्या अनेकांनी मतदान करून तरुणांनाही आवाहन केले होते. महापालिका निवडणुकीसाठीही या ज्येष्ठांनी मतदानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निवडणूक विभागाने याविषयी कोणतीही तयारी केलेली नाही. मतदान केंद्रावर ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर व इतर सुविधा दिल्या आहेत. पण घरामध्ये मतदानाची सोय केलेली नाही.
गृहमतदानाची सोय नसल्यामुळे बेडरीडन नागरिकांची गैरसोय होणार आहे. या मतदारांना केंद्रापर्यंत कसे घेऊन जायचे, असा प्रश्न आहे.
रवींद्र सावंत, काँग्रेस प्रवक्ते, नवी मुंबई
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु महापालिका निवडणुकीसाठी नियमांत गृहमतदानाची तरतूद नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नाही.
दिनेश वाघमारे, आयुक्त, राज्य निवडणूक आयोग