उरणमध्ये ठिकठिकाणी श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 15:46 IST2023-03-30T15:45:43+5:302023-03-30T15:46:23+5:30
उरण परिसरातील ठिकठिकाणच्या मंदिरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उरणमध्ये ठिकठिकाणी श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
उरण :उरण परिसरातील ठिकठिकाणच्या मंदिरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण परिसरात नवीन शेवा,फुंडे, देऊळवाडी, हनुमान कोळीवाडा, मोरा कोळीवाडा, चिरनेर आदी राम मंदिरात श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.चिरनेरमध्ये १२५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या मधीलपाडा - तेलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीही प्रभु श्री रामचंद्राचा अभिषेक सोहळा विधीपूर्वक पूजा अर्चेने पार पडला.मंदिरात अभिषेक, हरिपाठ,भजन कीर्तन प्रवचन,पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
किर्तनकार हभप प्रकाश महाजन यांचे श्री रामचंद्रांच्या जन्मावर सुश्राव्य किर्तनही पार पडला.मोरा कोळीवाडा,फुंडे, नवीन शेवा येथील राममंदिरही भक्तांनी गर्दी केली होती.या राममंदिरातही भजन-किर्तनाचा भक्तांनी आनंद लुटला.उरण शहरातील राममंदिरही भक्तांनी गजबजले होते.बारा वाजता श्री रामचंद्रांना पाळण्यात टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"