जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 21:09 IST2023-04-23T21:09:20+5:302023-04-23T21:09:46+5:30
उरण : जसखार ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारा विरोधात उपसरपंच प्रणाली म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीची ...

जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या चौकशीचे आदेश
उरण : जसखार ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारा विरोधात उपसरपंच प्रणाली म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राजिपचे उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच काशीबाई ठाकूर व ग्रामसेवक राजेंद्र सातंगे यांनी विरोधी सदस्यांच्या तक्रारीनंतर मनमानी कारभार करत कोट्यावधींची बिले अदा केली आहेत.या विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींनंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे चौकशीच्या मागणीसाठी उरण गटविकास अधिकारी कार्यालयासमोर सहा महिला सदस्यांनी उपोषणही केले होते.तक्रारी आणि उपोषणाची दखल घेऊन राजिपचे उपकार्यकारी अधिकारी विशाल दौंडकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.