Navi Mumbai Municipal Corporation presents Rs 3850 crore budget | नवी मुंबई महानगरपालिकेचा 3850 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

नवी मुंबई महानगरपालिकेचा 3850 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

ठळक मुद्देअर्थसंकल्पात शहर विकासाच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. वाशी सेक्टर 17, घणसोली ते ऐरोली दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नेरूळ सेक्टर 19 मध्ये 8.50 एकर जमिनीवर सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई - महानगरपालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी 3850 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर केला. शहरवासीयांवर यावर्षीही कोणतीच करवाढ करण्यात आली नाही. स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून 1250 व मालमत्ता करातून 630 कोटी महसूल प्राप्त होणार आहे. अर्थसंकल्पात शहर विकासाच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. वाशी सेक्टर 17, घणसोली ते ऐरोली दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. आग्रोळी तलाव ते कोकण भवन दरम्यान ही उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 

नेरूळ सेक्टर 19 मध्ये 8.50 एकर जमिनीवर सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. घणसोली मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल उभारणे प्रस्तावित केले आहे. वाशीमध्ये तरण  तलावाचे काम मार्गी लावण्यात  येणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक वर्षी सरासरी एक हजार विद्यार्थी वाढत आहेत. यामुळे महापालिका शाळांसाठी वाढीव वर्गखोल्या वाढविण्यात येणार आहेत. स्मार्ट पार्किंग,  सायकल ट्रॅक, मध्यवर्ती ग्रंथालय, वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहे. 

सन 2020- 21 मधील उत्पन्नाचा अंदाज 

स्थानिक संस्था कर - 1250 कोटी

मालमत्ता कर - 630 कोटी 

विकास शुल्क- 1250 कोटी 

पाणी पट्टी- 115. 59 कोटी

परवाना व जाहिरात शुल्क - 10.07 कोटी

अतिक्रमण शुल्क- 4.10 कोटी

मोरबे धरण व मलनिसःरण- 35.67 कोटी 

रस्ते खोदाई शुल्क- 27.15 कोटी 

आरोग्य सेवा शुल्क- 10.09 कोटी 

केंद्र व राज्य शुल्क- 160. 56 कोटी 

संकीर्ण जमा- 263.97 कोटी 

आरंभीची शिल्लक- 1217.76 कोटी

एकूण - 3850 कोटी

What will come out of the budget table? | अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघणार

2020- 21 वर्षात असा होणार खर्च 

नागरी सुविधा- 987.11 कोटी

प्रशासकीय सेवा- 638.69

पाणी पुरवठा व मलनिसःरण- 580.91 कोटी 

उद्यान व मालमत्ता- 389.72 कोटी

ई गव्हर्नस - 22.65 कोटी

सामाजिक विकास- 43.72 कोटी

घनकचरा व्यवस्थापन-429.15 कोटी

केंद्र व राज्य शासन योजना - 90.18 कोटी 

आरोग्य सेवा- 166.60 कोटी

परिवहन सेवा-96 कोटी 

आपत्ती निवारण- 85.63 कोटी 

शासकीय कर परतावा- 11.65कोटी

शिक्षण - 152.73 कोटी 

कर्ज परतावा- 38.15 कोटी 

अतिक्रमण- 11.12 कोटी 

एकूण- 3848.91 कोटी
 

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation presents Rs 3850 crore budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.