मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2022 22:56 IST2022-12-08T22:55:49+5:302022-12-08T22:56:41+5:30

सागरी मार्गावरील गाळाची समस्या कायम राहिल्याने  पाच दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

mora bhaucha dhakka sea lounge service in the mud passenger traffic has been stopped for the past five days | मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

मधुकर ठाकूर, उरण : सागरी मार्गावरील गाळाची समस्या कायम राहिल्याने  पाच दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

प्रवासी वाहतूक अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी चार   महिन्यांपूर्वीच मोरा बंदरातील चार कोटी खर्चून बंदरातील गाळ काढण्यात आला होता.मात्र बंदरात गाळाची समस्या कायम राहिल्याने ५  ते १० डिसेंबर दरम्यान पाच  दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोट्यावधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

मोरा बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी मोरा बंदरात प्रवासी गाळात रुतून बसतात.प्रवाशांना घेऊन येणाऱ्या प्रवासी बोटी बंदरापर्यत पोहचू शकत नाहीत.त्यामुळे समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी ठराविक काळावधीसाठी बंद ठेवण्यात येतात.

त्यामुळे दररोज कामासाठी मुंबईत जाणाऱ्या हजारो  प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. गाळामुळे सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात येतो.मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे थांबलेले नाही. मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे ५  ते १० डिसेंबर दरम्यान सलग पाच दिवस प्रवासी वाहतूक ठराविक काळावधीसाठी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mora bhaucha dhakka sea lounge service in the mud passenger traffic has been stopped for the past five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण