मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 17:38 IST2023-08-09T17:38:05+5:302023-08-09T17:38:26+5:30
उरण शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने केली.

मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने
मधुकर ठाकूर, उरण : केंद्रातील मोदी सरकार राबवित असलेली धोरणे ही जनता विरोधी असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. या सरकारला चले जाव चा नारा देत बुधवारी (९) ऑगस्ट क्रांतीदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या संघटनांनी उरण शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने केली.
यावेळी मोदी सरकार चले जाव चे फलक झळकावत घोषणाही देण्यात आल्या. या निदर्शनापूर्वी उरण चारफाटा ते गांधी चौक दरम्यान मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. निदर्शनात केंद्रातील मोदी सरकारच्या महिला,युवक,महागाई, बेरोजगारी, कामगार विरोधी कायदे,शेतकऱ्यांचे निर्माण झालेले प्रश्न याला मोदी सरकार राबवित असलेली धोरणे जबाबदार असल्याची भूमिका मांडण्यात आली. यावेळी जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील,जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अमिता ठाकूर,किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष संजय ठाकूर,सीआयटीयुचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन म्हात्रे यांनी आपली मते मांडली.