नवी मुंबईत ३२९४ गणेशमूर्तींचे झाले विसर्जन; कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:07 IST2020-08-28T00:07:08+5:302020-08-28T00:07:40+5:30
कोपरखैरणे ठरला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न

नवी मुंबईत ३२९४ गणेशमूर्तींचे झाले विसर्जन; कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पाचव्या दिवशी ३२६४ घरगुती आणि ३० सार्वजनिक अशा एकूण ३२९४ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी पसंती दिली असून कोपरखैरणे येथील कृत्रिम तलावांवर सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याने कोपरखैरणे कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न ठरला आहे.
कोव्हीड १९च्या कालावधीत यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवात नवी मुंबईकर नागरिकांनी शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनास अनुसरून स्वयंशिस्तीचे पालन करीत जागरूक व जबाबदार नागरिकत्वाचे सर्वच विसर्जन स्थळांवर दर्शन घडविले आहे. आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देत नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केलेच. शिवाय पर्यावरणपूरक संदेशही स्वत:च्या कृतीतून दिला, कोपरखैरणे तलावाठिकाणी तर मुख्य विसर्जन तलावामध्ये केवळ ३ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल.१३५कृत्रिम तलावात १९९३ घरगुती तसेच २२ सार्वजनिक अशा एकूण २०१५ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाकरिता महानगरपालिका आठही विभाग कार्यालयांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था नियोजनबध्दरित्या कार्यरत होती.
विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डसयांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख होता.
२२ विसर्जन स्थळांवर १२७१ घरगुती व ८ सार्वजनिक अशा एकूण १२७९ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण १३५ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये १९९३ घरगुती व २२ सार्वजनिक अशा एकूण २०१५ श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.