भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल जपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:05 IST2020-10-13T20:55:21+5:302020-10-14T01:05:34+5:30
सिन्नर: मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची भाजप उद्योग आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी (संयोजक) निवड करण्यात आली आहे.

भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल जपे
सिन्नर: मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची भाजप उद्योग आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी (संयोजक) निवड करण्यात आली आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. जपे यांच्या रुपाने भाजप उद्योग आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व करण्याची संधी सिन्नरला पहिल्यांदाच प्राप्त झाली आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पेशकार यांनी सिन्नरला येत स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे, अरुण चव्हाणके, व्यवस्थापक कमलाकर पोटे, उद्योजक आशीष नहार, किरण वाजे, बबन वाजे आदींच्या उपस्थित जपे यांच्या निवडी संदर्भात माहिती देत त्यांचा सन्मान केला. दरम्यान, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, स्टाईसचे चेअरमन पंडीतराव लोंढे, निमाचे संचालक अतुल अग्रवाल, सचिन गोळेसर, गोरख गोळेसर, विशाल क्षत्रिय, सुरेश उगले आदींसह पदाधिकार्यांनी सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत येत जपे यांचा सत्कार केला.