हजारो दिव्यांनी उजळले सर्वतीर्थ टाकेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 10:54 PM2020-11-30T22:54:27+5:302020-12-01T01:00:01+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Thousands of lamps lit up everywhere | हजारो दिव्यांनी उजळले सर्वतीर्थ टाकेद

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांनी उजळून निघालेले टाकेद तीर्थाचे मनमोहक दृश्य.

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षित अंतर राखत भाविकांकडून रामचंद्रांच्या जयघोषात दीपोत्सव

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे रविवारी (दि.२९) हजारो पंत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी, पणती पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी येथील महंत राजेश पुरी यांचे सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील शिष्य दादाभाऊ लक्ष्मण गोसावी यांच्या हस्ते हजरो दीप प्रज्वलित करण्यात आले. मोजक्या भाविक-भक्तांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वतीर्थ संस्थानचे महंत किशोरदास श्रीवैष्णव, पंडित दिलीप पुजारी, कीर्तनकार चिमणकाका परदेशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राजेंद्र घोरपडे, श्रीराम पाबळकर यांच्यासह महंत दादा गोसावी, समाधान कावळे, वैभव खोडे, विजय गोवर्धने, जनार्दन जगताप, सुनील नेवकर,गोरख बर्वे, वामन खोडे, वैभव गोसावी, रामराव भागवत, किरण गायधनी, संजय आहेर, महेश तुंगार, समाधान कांडेकर, शुभम गोसावी उपस्थित होते.
सायंकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामांच्या व शंकराच्या मंदिरात भक्तांनी आरती करून संपूर्ण तीर्थ परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. या हजारो पणत्यांच्या प्रकाशाने तीर्थ परिसर उजळून निघाला होता. हजारो दिव्यांनी येणाऱ्या सर्व भाविकांचे लक्ष वेधले.

टाकेद तीर्थक्षेत्री दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याने ही पौर्णिमा दीप प्रज्वलित करून साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा टाकेद तीर्थावर भाविकांची अल्प गर्दी पहावयास मिळाली. कोरोना लवकर जाऊ दे, असे साकडे भाविकांनी प्रभू रामचंद्रांना घातले.


 

Web Title: Thousands of lamps lit up everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.