Sleet | वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : हातातोंडाशी आलेल्या शेतमालावर संक्र ांत ; कांदे, गहू, मकाचे नुकसान

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
गेल्या दोन दिवसांपासुन वातावरणात बदल झाल्याने सकाळपासून मोठ्या प्रमाणात उष्णता होती. दुपारच्या नतंर आणखी उकाडा वाढल्याने सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास येथे वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वादळी पावसाचा प्रामुख्याने कांदा व गहू पिकाला फटका बसला आहे.
बाजार समिती, आठवडे बाजार बंद असल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शेतकºयांना जोरदार वादळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी पाचनतंर अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरु वात झाली.
परिसरातील अनेक शेतकºयांनी शेतात कांदे काढून ठेवले होते. कांदा भरण्याचे काम सुरु असतानाच पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गहू सोंगणी सुरु असतानाच पाऊस आल्याने शेतकºयांची धावपळ उडाली. तसेच अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. यावेळी सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते.

Web Title: Sleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.