सिन्नर नगरपरिषेदला १२ नवीन अत्याधुनिक घंटागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:49 IST2021-01-16T20:26:18+5:302021-01-17T00:49:54+5:30
सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आहे.

सिन्नर नगरपरिषेदच्या आरोग्य विभागास १२ अत्याधुनिक घंट्यागाड्या देण्यात आल्या. त्याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्यासह नगरसेवक.
सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आहे.
माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले.
शहराचा विस्तार वाढल्याने आरोग्य विभागावर कामाचा ताण पडत होता. कचरा नियमित गोळा करण्यासाठी वाहनांची गरज व्यक्त केली जात होती. अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाने आनंद व्यक्त केला. नगरपरिषदेने मैला व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. कचऱ्याचीही दैनंदिन विल्हेवाट लावली जात असल्याने, ही प्रक्रिया नियमित व वेळेत होण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रकल्प अहवाल सादर केला होता. तो मंजूर करण्यात नगराध्यक्ष डगळे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. त्यातून बारा नवीन घंटागाड्या घेण्यात आल्या आहेत. शहर व उपनगरांतून रोज २२ टन कचरा गोळा केला जातो. नगरपरिषदेच्या ६ घंटा गाड्यांसह ठेकेदारीतील ८ ट्रॅक्टरच्या साहाय्याने कचरा गोळा करण्याची प्रक्रिया केली जाते. नव्याने १२ वाहने दाखल झाल्यामुळे महिन्याला होणारा चार लाख ५० हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे.
यावेळी गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, मल्लू पाबळे, सुजाता भगत, ज्योती वामने, नलिनी गाडे, प्रतिभा नरोटे, उपअभियंता हेमलता दसरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, दीपक पगारे, साहिल शेख, राकेश शिंदे, अरफाज अत्तार, अक्षय नागरे आदींसह नागरिक उपस्थित होते.