दिंडोरीत शिवसेनेने उमेदवार बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:08 IST2019-10-05T01:06:49+5:302019-10-05T01:08:06+5:30
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाने अखेर धनराज महाले यांच्याऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांना पक्षाने सुधारित एबी फार्म दिला.

दिंडोरीत शिवसेनेने उमेदवार बदलला
दिंडोरी : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाने अखेर धनराज महाले यांच्याऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांना पक्षाने सुधारित एबी फार्म दिला.
धनराज महाले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर शिवसेना भाजप-युतीतर्फे शक्ती प्रदर्शन करत भास्कर गावित यांनी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू असतानाच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी देखील शिवसेनेतर्फेआणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला .दरम्यान धनराज महाले व रामदास चारोस्कर या दोघांचेही अपक्ष अर्ज दाखल झाल्याने आता हे दोघे उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार याकडे लक्ष लागले असून सोमवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दिंडोरी-पेठ मतदारसंघात ९ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले असून वंचित आघाडी, मनसे, बसपा, भारतीय ट्रायबल पार्टी या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच माकपाने अर्ज दाखल केलेला नाही.