बाधितांचा लागणार शोध; ‘सच प्रणाली’ कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:45 IST2020-07-29T23:29:29+5:302020-07-30T01:45:19+5:30

सिन्नर : कोविड रुग्ण तत्काळ शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ‘सच प्रणाली’ या आॅनलाइन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. येथील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात या अ‍ॅपचा वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.

Search for victims; ‘True system’ implemented | बाधितांचा लागणार शोध; ‘सच प्रणाली’ कार्यान्वित

बाधितांचा लागणार शोध; ‘सच प्रणाली’ कार्यान्वित

ठळक मुद्देसिन्नर : तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोविड रुग्ण तत्काळ शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी ‘सच प्रणाली’ या आॅनलाइन अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. येथील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात या अ‍ॅपचा वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठक हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सदस्य नीलेश केदार, सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती शोभा बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी उपस्थित
होते.अ‍ॅपची मदतसच अ‍ॅपद्वारे शारीरिकदृष्ट्या दुर्धर तथा अन्य आजाराने बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी या प्रणालीचा चांगला उपयोग होणार असल्याचे ना. क्षीरसागर यांनी सांगितले. सदर अ‍ॅपद्वारे विविध आजाराने बाधित रुग्णास कोविड बाधित होण्याचा धोका जास्त असल्याने अशा रुग्णांना विशेष आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Search for victims; ‘True system’ implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.