वावीत ५ हजार रुपये रोखपालाकडून परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:29 IST2020-06-23T22:27:09+5:302020-06-23T22:29:37+5:30

सिन्नर : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेत एक लाखाची मुदतठेव करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आलेली पाच हजार रुपये जास्तीची रक्कम रोखपाल भगवान भोपी यांनी परत केली.

Return of Rs. 5,000 from the cashier | वावीत ५ हजार रुपये रोखपालाकडून परत

वावीत ५ हजार रुपये रोखपालाकडून परत

ठळक मुद्देभोपी यांच्यासह पतसंस्थेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेत एक लाखाची मुदतठेव करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आलेली पाच हजार रुपये जास्तीची रक्कम रोखपाल भगवान भोपी यांनी परत केली.
सदरचा ज्येष्ठ नागरिक वारंवार मी जास्तीचे पैसे दिले नाहीत असे सांगत असताना भोपी यांनी व्यवस्थापक यशवंत गवळी यांच्या मदतीने भरण्याची ही रक्कम पुन्हा मोजून दाखवल्यावर या ठेवीदारांचे समाधान झाले. नकळत ठेवीच्या रकमेत हे पैसे वाढल्याचे पाहून सदर ज्येष्ठाने रक्कम परत केल्याबद्दल भोपी यांच्यासह पतसंस्थेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.

Web Title: Return of Rs. 5,000 from the cashier