Reach in Ganesh temples on the occasion of Sankashti Chaturthi | संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये रीघ

संकष्टी चतुर्थीनिमित्त आनंदवली येथील श्री नवश्या गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ. 

नाशिक : संकष्टी चतुर्थीला रविवारचा मुहूर्त लाभल्याने भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. ऐन रविवारच्या सुटीच्या दिवशी ही चतुर्थी आल्याने महिला भाविकांसह कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरांबाहेर रीघ लागली होती.
महानगरातील ऐतिहासिक वारसा असलेली, जुने नाशिक, पंचवटीतील गणपतीच्या मंदिरांमध्ये जाऊन संकष्टी चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शहरातील ढोल्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, भद्रकातील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवश्या गणपती या ठिकाणी भाविकांनी दिवसभर रांगा लावून दर्शन घेतले. या मंदिरांमध्ये दिवसभर गणपती अथर्वशीर्ष अभिषेक करण्यात आला. नवश्या गणपतीला तर रविवारच्या सुटीमुळे यात्रेचेच स्वरूप आले होते. रविवारच्या सुटीमुळे हा पिकनिक स्पॉट झाला असल्याने चतुर्थीच्या दिवशी येथे भाविक दर्शनला येतात.

Web Title: Reach in Ganesh temples on the occasion of Sankashti Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.