नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रमेश बिडवे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:07 IST2020-08-30T16:06:45+5:302020-08-30T16:07:13+5:30
सिन्नर: राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रमेश बिडवे यांची निवड करण्यात आली.

नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रमेश बिडवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र देताना राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे. समवेत पदाधिकारी.
सिन्नर: राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रमेश बिडवे यांची निवड करण्यात आली.
नाभिक एकता महासंघाच्या मिठसागरे येथील कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांनी रमेश बिडवे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली. याप्रसंगी नाभिक एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय वाघ , महाराष्ट्र राज्य सलुन असोसिएशनचे प्रांत अध्यक्ष विजय पंडीत, देवेंद्र तासकर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष किरण बिडवे, उत्तर विभागीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ मोरे, सुभाष बिडवई , सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र बिडवे, सलून असोसिएशन सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप व्यवहारे, केशव बिडवे, गणेश चौधरी, बाळासाहेब साळुंके, माधव शिंदे, गणेश कडवे, महेंद्र कानडी, सलून अशोक सूर्यवंशी , दिलीप कडवे सर , गणेश कदम ,संतोष कदम मधुकर वाघ, रामेश्वर वाघ, संजय पंडित, दत्ता पंडित ,बापू बिडवे, बबलू गायकवाड, बाळासाहेब कडवे, अशोक भराडे साईनाथ साळुंके ,राजू तुपे ,अविन बिडवे ,कृष्णा कडवे, राम पंडित , आदींसह शेकडो नाभिक बांधव व पदाधिकारी हजर होते.