दिंडोरीच्या प्र. नगराध्यक्षपदी कैलास मवाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:06 IST2020-08-12T22:41:33+5:302020-08-13T00:06:24+5:30
दिंडोरी : येथील नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कैलास मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिंडोरीच्या प्र. नगराध्यक्षपदी कैलास मवाळ
ठळक मुद्देशहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : येथील नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कैलास मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा रचना जाधव काही दिवसांसाठी वैयक्तिक कामानिमित्त रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार कैलास मवाळ यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला. शहरातील प्रलंबित तसेच काही करावयाच्या मूलभूत समस्या सोडवत विविध विकासकामे करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मवाळ यांनी सांगितले.