गणपती विसर्जन करतांना पिंपळगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 18:25 IST2020-09-01T18:25:18+5:302020-09-01T18:25:37+5:30
दोन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

गणपती विसर्जन करतांना पिंपळगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू
पिंपळगाव बसवंत (नाशिक)- शहरातील कादवा नदी पत्रात गणपती विसर्जन करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत झाल्याची घतना घडली. यांपैकी दोन कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.रवी मोरे (30) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून कादवा नदी पात्रात चोख बंदोबस्तात पिंपळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिसरातील गणपती विसर्जन केले जाते. मात्र कोरोनाच्या या महामारीत ग्रामपंचायत मार्फत कृत्रिम तलाव उभारून व गणपती कृत्रिम तालावतच विसर्जन करा असे आव्हान करूनही काही नागरीक कादवा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी जातील म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतने दरवर्षी प्रमाणे गणपती विसर्जनासाठी जलतरण फलक उभारले.दिवसभारत शेकडो गणपती विसर्जन केल्यानंतर सायंकाळी चारच्या दरम्यान पिंपळगाव ग्रामपंचायतच्या गणपती विसर्जन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विघ्न आले. तीन कर्मचारी गणपती विसर्जन करतांना कादवा नदी पत्रात पडले असता त्यातील दोन जणांना वाचवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले तर रवी मोरे वय ( ३०) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.