नामको बँकेच्या सल्लागारपदी पन्नालाल शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:04 IST2020-09-16T15:01:56+5:302020-09-16T15:04:05+5:30

सिन्नर: नाशिक मर्चंट को-आॅप. बँकेच्या सिन्नर शाखा सल्लागारपदी येथील प्रतिष्ठित व्यापारी पन्नालाल हिरालाल शाह यांची निवड करण्यात आली आहे.

Pannalal Shah as Advisor to Namco Bank | नामको बँकेच्या सल्लागारपदी पन्नालाल शाह

पन्नालाल शाह

ठळक मुद्देबँकेचे संचालक गणेश गिते यांनी शाह यांना निवडीचे पत्र दिले.

सिन्नर: नाशिक मर्चंट को-आॅप. बँकेच्यासिन्नर शाखा सल्लागारपदी येथील प्रतिष्ठित व्यापारी पन्नालाल हिरालाल शाह यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समतिी अध्यक्ष व बँकेचे संचालक गणेश गिते यांनी शाह यांना निवडीचे पत्र दिले. संचालक मंडळाने एकमताने शाह यांची निवड केली. त्यांनी निवडीबद्दल बँक पदाधिकार्?यांचे आभार मानले. राजकारणापासून अलिप्त असलेले शाह यांना सन्मान दिल्याबद्दल व्यापारीवर्गातून निवडीचे स्वागत होत आहे.
 

Web Title: Pannalal Shah as Advisor to Namco Bank