Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:22 PM2019-10-21T22:22:01+5:302019-10-21T22:24:09+5:30

Maharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले

Nashik district polls: 60.13 percent Nifad has the highest percentage of 73.68% | Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

Next
ठळक मुद्देनाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान २००९साली विधानसभा निवडणूकीत नाशिकमध्ये ६०.१५ टक्के

नाशिक : विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया सोमवारी (दि.२१) शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडली. जिल्ह्यात ६ वाजेअखेर एकूण ६०.१३ टक्के इतके मतदान झाले. शहरात सर्वाधिक नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के इतके मतदान झाले. तसेच निफाड तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ७३.६८ टक्के इतके मतदान नोंदविले गेले.
नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५४.५४ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. जिल्ह्यात या वेळेत सर्वाधिक कळवणमध्ये ६७.३५ तर दिंडोरी मतदारसंघात ६५.१७ टक्के इतके मतदान झाले. मात्र अखेरच्या तासाभरात चित्र बदलले. फिरले आणि कळवणमध्ये ६७.८२ टक्के तर दिंडोरीत ६९.६८ टक्के मतदान सहा वाजेअखेरपर्यंत झाले. पावसाने उघडीप दिल्याने सायंकाळी ५ वाजेनंतर नाशिक मध्यमधील विविध मतदान केंद्रे तसेच पुर्वमधील पंचवटी भागातील मतदान केंद्रांवर गर्दी लोटल्याचे दिसून आले. त्यामुळे ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघात ६ वाजेअखेर एकूण ५४.२० टक्के मतदान झाले. नाशिक देवळाली मतदारसंघात ६ वाजेअखेर ५६.०५ टक्के मतदान नोंदविले गेले.
२००९साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत नाशिकमध्ये ६०.१५ टक्के तर २०१४ साली नाशिकमध्ये ६४.६० टक्के मतदान झाले होते. या तुलनेत यंदा ४ टक्क्यांनी एकूण मतदानात घट झाल्याचे दिसून येते.
नाशिक शहर व परिसरात सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सर्वच केंद्रांवर सकाळच्या सुमारास शुकशुकाट जाणवला. हळुहळु ज्येष्ठ नागरिकांची पावले केंद्रांकडे वळू लागल्याचे चित्र दिसले. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील पुर्वमध्ये १२.७३%, मध्यमध्ये अवघे १०.६०% तर पश्मिमध्ये ११.५९% टक्के इतके मतदान नोंदविले गेले होते. यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत अनुक्रमे वरील तीनही मतदारसंघात २२.९५ %, १९.३४%, २५.६४% टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत अल्पशी वाढ वरील मतदारसंघात झाली; मात्र दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या संख्येने मतदारराजा घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढत गेला. मध्य मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४०.६६टक्के, पुर्वमध्ये ४० टक्के, पश्चिममध्ये ४८.२९ टक्क्यांपर्र्यंत मतदान नोंदविले गेले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देवळाली मतदार संघाचा आकडा ४७.५२ टक्क्यांवर पोहचला होता. नाशिक जिल्ह्यात ६वाजेअखेर एकूण ६०.१३ टक्के इतके मतदान झाले.
 

Web Title: Nashik district polls: 60.13 percent Nifad has the highest percentage of 73.68%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.