नाशिक निवडणूक निकाल : बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:09 PM2019-10-24T13:09:07+5:302019-10-24T13:09:14+5:30

Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला.

Nashik, Baglan, Dilip Borse vs Dipika Chavhan | नाशिक निवडणूक निकाल : बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे विजयी

नाशिक निवडणूक निकाल : बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे विजयी

googlenewsNext

बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला.
बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत झाली. गेल्या निवडणुकीत तब्बल अकरा उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होती. अखेरच्या चरणात मात्र भाजप व राष्ट्रवादीत चुरशीचा सामना झाला. बागलाण हा शेतकरी, आदिवासी, मजूर, मध्यमवर्गीय मतदारांचा मतदारसंघ आहे. या भागातील मतदार शेतीव्यवसायाशी निगडित असल्यामुळे साहजिकच शेती आणि पाणी समस्या हे कळीचे मुद्दे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक कोणतीही असो या प्रश्नांभोवतीच फिरत असते.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये बागलाण स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. यापूर्वी बागलाणची ३८ गावे कळवण मतदारसंघात होती, तर देवळा तालुक्यातील १२ गावे बागलाण मतदारसंघात होती. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोसम, आरम, करंजाडी, काटवण आणि पश्चिम आदिवासी पट्टा या पाच भागात विभागला गेला आहे. बागलाणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोसम खोऱ्याला जास्त मिळाली आहे. बागलाणचे पहिले आमदार सजन राघो पाटील यांच्या रूपाने काटवणला एकदा मान मिळाला आहे. आरम खोºयाला १९८४ मध्ये बसवाहक रुं जा पुंजा गांगुर्डे, त्यानंतर २००४ मध्ये अजमीर सौंदाणे येथील संजय चव्हाण, तर २०१४ मध्ये दीपिका चव्हाण यांच्या रूपाने मान मिळाला होता.

 

Web Title: Nashik, Baglan, Dilip Borse vs Dipika Chavhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.