कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 06:34 PM2020-10-21T18:34:04+5:302020-10-21T18:34:48+5:30

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे

Mud season begins today | कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

Next
ठळक मुद्देगळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते होणार

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली आहे.

गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते होणार असून माजी चेअरमन ॲड. बाजीराव कावळे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार माणिक कोकाटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार शिरीशकुमार कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे राहणार आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. पुरेशी ऊस तोड मजूर भरती करण्यात आली असून ऊस तोड कार्यक्रम आखण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन उत्तम भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

Web Title: Mud season begins today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.