एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:37 IST2020-07-01T21:36:55+5:302020-07-01T21:37:27+5:30

देशसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टÑपती यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवही करण्यात आला आहे.

K. Shyamsunder as Commodore of Air Force Station | एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर

एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर

नाशिक : देवळाली कॅम्प येथील एअरफोर्स स्टेशनच्या द कमान्ड आॅफ २५-इक्विपमेंट डेपोच्या एअर कमोडोरपदाची सुत्रे विशिष्ट सेवा मेडल प्राप्त के.श्यामसुंदर यांनी बुधवारी (दि.१) मावळते एअर कमोडोर रवी शर्मा यांच्याकडून स्विकारली.
देवळाली येथील एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदाचा पदभार स्विकारणारे के.श्यामसुंदर यांना लॉजिस्टिकमध्ये कमिशन प्राप्त आहे. तसेच १९८७ साली भारतीय वायुसेनेच्या विविध शाखांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर कामगिरी बजावली आहेत. दोन उपकरणे डेपोचे कमान्डींग आॅफिसर, लॉजिस्टिक कमांडचे डेप्यूटी चिफ, कमांड मुख्यालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी आदि पदांचा समावेश आहे. देशसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टÑपती यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवही करण्यात आला आहे.

स्थानिक एअरफोर्स वाइव्हस वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यपदाची धुरा के.श्यामसुंदर यांच्या पत्नी पद्मा श्यामसुंदर यांनी स्विकारली आहे. त्या विशेष शिक्षिका आहेत.

Web Title: K. Shyamsunder as Commodore of Air Force Station