पवार स्कूलमध्ये यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:46 IST2020-08-11T18:45:59+5:302020-08-11T18:46:31+5:30
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे.

मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेला माजी विद्यार्थी सुमित जगताप यांचा सत्कार करताना डॉ. जे. डी. पवार. समवेत अनुप पवार, बी.एन. शिंदे, जे.एल. पटेल, विलास शिरोरे आदी.
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमित जगताप यांच्या यशाचा सार्थ अभिमान बाळगत संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बी. ए. कापसे होते. आईवडिलांचे आशीर्वाद, माझी मेहनत व निर्धार, तसेच शालेय जीवनात शाळेने लावलेली शिस्त, शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान, मैदानी खेळांचे प्रशिक्षण यामुळे योग्य पायाभरणी झाल्यामुळे हे यश संपादन करता आले, असे सुमित जगताप यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. अथक व अविरत परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली असून, इच्छित ध्येय साध्य होईपर्यंत शांत बसू नका. हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी फामर्सी कॉलेजचे प्राचार्य अविश मारू, प्राचार्य कोठावदे, प्रेरणा फाउण्डेशनचे संचालक जीवन ठाकरे, बी.एड.च्या प्राचार्य डॉ. सोनवणे, श्री विश्वेश्वरन, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी उपस्थित होते.