पाहणाºयांच्या पोटात उठतो गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:16 IST2020-03-13T00:14:12+5:302020-03-13T00:16:29+5:30
सिन्नर : आपल्या हाताच्या इवल्याशा मुठीत जगभराचे नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी मोबाइल टॉवरची उभारणी करणाºया कष्टकरी मजुरांची जीवघेणी कसरत सिन्नर तालुक्यातील वावी येथे गुरुवारी (दि.१२) रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांनी अनुभवली आणि पोटासाठी जीवघेण्या कळा सोसणाºया या मजुरांना पाहून बघ्यांच्याही पोटात क्षणभर गोळा उठला.

पाहणाºयांच्या पोटात उठतो गोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : आपल्या हाताच्या इवल्याशा मुठीत जगभराचे नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी मोबाइल टॉवरची उभारणी करणाºया कष्टकरी मजुरांची जीवघेणी कसरत सिन्नर तालुक्यातील वावी येथे गुरुवारी (दि.१२) रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांनी अनुभवली आणि पोटासाठी जीवघेण्या कळा सोसणाºया या मजुरांना पाहून बघ्यांच्याही पोटात क्षणभर गोळा उठला.
तालुक्यातील वावी येथे विठ्ठल मंदिराजवळ एका खासगी कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू झाले आहे. एका दिवसात पाच मजुरांनी सुमारे १०० फूट उंच टॉवर उभारणीचे काम पूर्ण केले. खाली दोन मजूर आणि टॉवर वर तीन मजूर यांची दिवस उगवल्यापासून ते मावळतीला येईपर्यंतची कसरत चालू होती. अक्षरश: जीवावर उदार होऊन टॉवर उभारणारे मजूर पाहून रस्त्याने ये- जा करणारे नागरिक कसरत पाहून अचंबित होत होते.
सुमारे शंभर फूट उंचीवर गेलेल्या या मजुरांची पोटासाठी चाललेली कसरत पाहून तर पाहणाºयांच्या पोटात गोळा येत होता. कोणतेही सुरक्षिततचे साधन नसताना एवढ्या उंचीवरून त्यांची चाललेली कसरत जीवघेणीच होती. सध्या राष्टÑीय सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असताना या मजुरांच्या लेखी मात्र हा सप्ताह दूरच होता. सुरक्षिततेबाबत सर्वच गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते, मात्र हे मजूर डोक्यात हेल्मेट नाही अथवा कोणतीही शाश्वत खबरदारीची उपाययोजना नसताना करत असलेले काम धोकादायक होतेच शिवाय, त्यांच्या कौशल्यालाही दाद देणारे होते. सर्वाना मोबाईल नेटवर्क मिळून संवाद अधिक सुकर व्हावा यासाठी मजुरांची ही जीवघेणी कसरत परिसरात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय बनली होती.