Donation to Sinnar Public Library | रेशनकार्डवर जीवनावश्यक वस्तू द्या

रेशनकार्डवर जीवनावश्यक वस्तू द्या

ठळक मुद्देसिन्नर: गोसावी यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली.
सोबत एक लिटर खाद्य तेलाची बाटली तहसीलदारांना भेट देऊन गांधीगिरी करण्यात आली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहेत. त्यात खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रतिलिटर 105 ते 140 रुपये दर झाले असून दर कमी करावे. खाद्यतेल, मैदा, साखर, हरभरा डाळ, रवा आदींसह इतर जीवनाश्यक वस्तू रेशन कार्डवर कमी दरात उपलब्ध करून देऊन गोरगरीबांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोसावी यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 

Web Title: Donation to Sinnar Public Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.