‘पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’चे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:04 IST2020-08-11T21:46:43+5:302020-08-12T00:04:06+5:30
सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.

सिन्नर येथे पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीअंतर्गत पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरण करताना नगराध्यक्ष किरण डगळे. समवेत हेमंत वाजे, संजय केदार, विद्याधर कुलकर्णी, पल्लव मावळे, रचना तिवारी, पंकज मोरे, अनिल जाधव, अर्जुन भोळे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.
स्टेट बँक सिन्नर शाखेच्या वतीने तीन लाभार्र्थींना नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्य अधिकारी संजय केदार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण झाल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी गटनेते हेमंत वाजे, भारतीय स्टेट बँकचे सिन्नर वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विद्याधर कुलकर्णी, यांच्यासह उपव्यस्थापक पल्लव मावळे, रचना तिवारी, नगरसेवक पंकज मोरे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे यांच्या उपस्थितीत लाभार्थी प्रकाश घुगे, विनायक गरगटे, मंगेश मुत्रक यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरण झाल्याचे पत्र देण्यात आले. अधिक माहितीसाठी सिन्नर नगर परिषद कार्यालयात शहर अभियान व्यस्थापन कक्ष येथे अनिल जाधव, अर्जुन भोळे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.फेरीवाल्यांना योजनेचा लाभकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे हाल झालेले असून, अशा पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन: सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. सिन्नरच्या शहरी भागात पथविक्री करणाºया व दि. २४ मार्च २०२० या ताराखेपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सर्वेक्षण झालेल्या आणि न झालेल्या शहरात व्यवसायास करणाºया सर्व पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.