पिंपरवाडी येथे चारशे झाडांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:48 IST2020-06-23T21:43:16+5:302020-06-23T21:48:52+5:30
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी ४०० झाडांचे वाटप करण्यात आले.

पिंपरवाडी येथे चारशे झाडांचे वाटप
ठळक मुद्देएक एक रोपटे प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी ४०० झाडांचे वाटप करण्यात आले. येत्या पावसाळ्यात घरासमोर लावण्यासाठी चांगल्या प्रतीच्या आंबा व सीताफळ या झाडांचे एक एक रोपटे प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. तर शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या फुलांची व फळांची झाडे उपलब्ध करून देण्यात आली. शाळेच्या आवारातील झाडांची निगा विद्यार्थ्यांच्या मदतीने राखण्यात येणार आहे. सरपंच सविता पवार, उपसरपंच वृषाली हाडोळे, सदस्य विजय गुरुळे, गणेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, किरण शिंदे, चंद्रकला मुंगसे, विजय गायकवाड, मुख्याध्यापक माने यावेळी उपस्थित होते.