बदापूर-ब्राम्हणगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:10 IST2020-10-07T20:38:04+5:302020-10-08T00:10:31+5:30

येवला : तालुक्यातील बदापूर-ब्राम्हणगाव रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून जनॅहतासाठी सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी निमगाव मढचे माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for repair of Badapur-Bramhangaon road | बदापूर-ब्राम्हणगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

बदापूर-ब्राम्हणगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

ठळक मुद्देतब्बल १६ वर्षात या रस्त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष

येवला : तालुक्यातील बदापूर-ब्राम्हणगाव रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून जनॅहतासाठी सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी निमगाव मढचे माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंॠी छगन भुजबळ यांना सदर निवेदन देण्यात आले. तालुक्यातून जाणारा बदापूर-ब्राम्हणगाव - नाटेगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा मागणीकरूनही सदर रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले गेले आहे. तब्बल १६ वर्षात या रस्त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणे देखील अवघड बनते. परिसरातील गावांच्या ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: Demand for repair of Badapur-Bramhangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.