बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नेमण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:55 IST2020-12-10T17:51:33+5:302020-12-10T17:55:53+5:30
सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी वीज वितरणचे कक्ष अभियंता सचिन पवार यांच्याकडे केली आहे.

बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नेमण्याची मागणी
सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी वीज वितरणचे कक्ष अभियंता सचिन पवार यांच्याकडे केली आहे.
गाव व परिसरामध्ये गेल्या आठ, दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभरात अचानकपणे कोणतीही सूचना न देता एक ते दोन तास वीज बंद केली जात आहे. तसेच तीन महिन्यांपासून बारागावपिंप्री येथे वायरमन नाही. वायरमन गवळी यांची बदली करण्यात आल्यानंतर गावात वायरमन नाही. त्यामुळे विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.